शिवसेनेकडून विधान परिषदसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित


मुंबई :. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक (Election) होणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातील 2 जागा आहेत. त्याजागी शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते हे आमदार होते. मात्र, आता या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी न देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन अहिर यांनी आपला वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी सुद्धा झालेत.आमशा पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात आणि काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेना पोहोचवली.