महिला पोलीस शिपायांला शिवीगाळ, गुंडाला अटक


पुणे : महिला पोलीस शिपायांना शिवीगाळ करुन तू लेडिजला उचलायला जेन्टसला कशाला सांगतेस असे म्हणून मी इथला भाई आहे, तुला चौकात नोकरी करायची हाय काय असे म्हणून अश्लिल शिवीगाळ केली. चौकातील येणार्या जाणार्या गाड्यांना अडथळा निर्माण करु लागला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अप्पर बिबवेवाडी येथील चौकात दुचाकीवरुन पडलेल्या महिलेला मदत करण्यासाठी महिला पोलिसांनी सहकारी पुरुष वाहतूक कर्मचार्याला सांगितले.त्यावरुन मदत करण्यासाठी पुढे येण्याऐवजी महिला पोलिसांना शिवीगाळ करुन धमकाविणार्याबरोबरच चौकातील गाड्यांना अडथळा आणणार्या गुंडाला अटक करण्यात आली आहे. अनिकेत गोकुळ केंदळे (वय २४, रा. अप्पर बिबवेवाडी) असे भाईगिरी करणार्याचे नाव आहे. दोन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी सागर रघुनाथ शिंदे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०५/२२) दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील शिवरायनगर येथील व्ही आय टी होस्टेल चौकात सोमवारी सायंकाळी सागर शिंदे हे वाहतूकीचे नियमन करीत होते. त्यावेळी एक महिला दुचाकीवरुन पडल्या. तेव्हा त्यांच्या सहकारी महिला पोलीस शिपाई या त्यांना उचलत होत्या. तेव्हा त्यांनी सागर यांना उचलण्यासाठी मदत करायला सांगितले. ते महिलेला उचलण्यासाठी गेले असताना अनिकेत केंदळे याने