एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही:शिवसेना नेत्या दिपाली सय्यद


एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही. एका राज्यसभेने मुंबईचे महापौर बनता येत नाही. तसेच एका राज्यसभेने कोल्हापूरची पोटनिवडणूक जिंकता येत नाही.106 काय 130 असूद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही, अशी घणाघाती टीका दिपाली सय्यद यांनी केली आहे.
जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रसेचे इमरान प्रतापगढी यशस्वी झाले आहेत. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीने ताकद लावली होती
. मात्र, काही अपक्षांची मते भाजपला गेल्याने महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला.राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपने तीनही जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे पियुष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यशस्वी झाले आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा पराभव झाला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे