संजय राऊत काठावर पास .- केंद्रीय मंत्री नारायण राणे

सिंधुदुर्ग : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत हे अवघ्या एका मताने जिंकून आले आहेत. ते या निवडणुकीत काठावर पास झाले आहेत. थोडक्यात ते आमच्या हातातून वाचले. अन्यथा शिवसेनेचा उमेदवार जिंकून आला नसता,” असा दावा भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला

राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणत शिवसेनेला चांगलेच तोंडघशी पाडले आहे. यावरून आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार च्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत, हेच या निकालातून अधोरेखित झाले आहे

“निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे जे नेते वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी जी भाषा वापरली नाही, तशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली. मात्र, निकालानंतर त्यांच्यावर आता नामुष्की ओढावली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणे, हे राज्याचे दुर्दैव आहे,”

.राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन उद्धव ठाकरे यांनी शिकावे, असा खोचक सल्ला राणेंनी दिला आहे”उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्या पाहिजे, आमदारांची भाजपवर असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे राज्यसभेची ही निवडणूक भाजपने जिंकली

Latest News