समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा’बुलडोजर राज’ रोखावे इन्क्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पुणेः

भारतीय एकात्मतेला आणि गंगा जमुना संस्कृतीला बाधा आणणाऱ्या आणि सामाजिक तेढ पसरवणाऱ्या नुपुर शर्मा, नवीन जिंदाल ,स्वामी सत्यानंद यासारख्या असामाजिक तत्वांवर, व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन आज इन्क्रेडिबल समाजसेवक ग्रुप च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले

इन्क्रेडिबल समाज सेवक ग्रुपचे अध्यक्ष असलम इसाक बागवान, रियाज बंगाली, राजू सय्यद ,मुन्ना बारस्कर, तौसिफ शेख यांनी हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी (गृह) श्री जाधव यांना दिले.

प्रेषित महमद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करून सर्वच मुस्लिम समाजाच्या भावना नुपूर शर्मा नवीन जिंदल यांनी दुखावल्या आहेत. जगात भारताची मान खाली झालेली आहे. संबंधितांवर भारतीय दंड संहिता कलम 120 अ, 121 124, १२४ अ, 142 153 268 295 295 अ, 298 कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना उत्तर प्रदेशामध्ये तेथील मुख्यमंत्री सूडबुद्धीने बुलडोझर राज्य चालवत आहेत आणि मुस्लीम समाजाला टारगेट करत आहेत. हे बुलडोजर राज रोखावे ,असेही या निवेदनात म्हटले आहे.

Latest News