१८ जून रोजी करियर मार्गदर्शन शिबीर


पुणे :
इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप तर्फे दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता १८ जून रोजी करियर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.कोंढवा पारगेनगर येथील सिटी लॉन्स येथे दुपारी दीड वाजता हे शिबीर होणार आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून कोंढवा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील उदघाटन करणार आहेत.करियर मार्गदर्शक संजय साळुंके,मानसशास्त्रज्ञ डॉ. विभा देशपांडे इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पुणे मनपा समाजविकास विभागामार्फत 70 टक्क्यांहून जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद तसेच शाहिर अण्णाभाऊ साठे योजने अंतर्गत अनुक्रमे 15 हजार दहावी करीता 10 हजार रूपये दहावी बारावीतील विद्यार्थांना शिक्षण फी तसेच बारावीत उज्ज्वल यश प्रात केलेल्या विद्यार्थ्यांना 25 हजार रूपये धनादेश देण्यात येणार आहेत .