सध्या ओबीसी समाज घटकां बाबत जी माहिती फीड केली जात आहे, ती चुकीची: छगन भुजबळ


नाशिक :सॅाफ्टवेअरमध्ये अशाच पद्धतीने माहिती भरण्यात येत असेल तर ते चुकीचे ठरेल. त्याबाबत वेळोवेळी सुचान केल्या आहेत. तरी देखील असचं होणार असेल तर यामुळे अडचण निर्माण होणारं आहे. आमचं म्हणणं आहे की, मतदान ओळखपत्र घ्या आणि त्याआधारे माहिती गोळा करा. परंतु असं होताना पाहायला मिळतं नाही.सध्या ओबीसी समाज घटकांबाबत जी माहिती फीड केली जात आहे, ती चुकीची आहे. याबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याच अन्न पुरवठा मंत्री. छगन भुजबळ यांनी सांगितले
मागच्या काही दिवसांत जी माहिती देण्यात आली. त्यामध्ये असे लक्षात आलं आहे की, सॉफ्टवेअरमध्ये जी नावं फिड करण्यात आली आहेत ती विशिष्ट जातीची आहेत. परंतु एकच आडनाव अनेक जातींमध्ये असते. त्यामुळे जी नावे घेतली जात आहे, ते चुक आहे. याबाबत शासनाने तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा `ओबीसी`घटकांची कत्तल होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहें
मोठया शहरात पाच टक्के आणि सहा टक्के ओबीसी आहेत, असा डेटा गोळा केला आहे. असं कसं असू शकतं. झोपडपट्टीत राहणारे एक तर दलित आहेत किंवा ओबीसी आहेत. मग तरी लोकसंख्या कमी कशी काय?.ओबीसी समाजाच्या जीवनाचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले आहेत ते यंत्रणेने तपासून घ्यायला हवे
राहुल गांधींची चौकशी गैर आहेते म्हणाले, सध्या रोज विरोधी पक्षाच्या नेत्यांवर धाडी सुरू आहेत. हे रोजचं झालं आहे. राहुल गांधी यांना तीन दिवस सलग चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. देशासाठी ज्यांनी जीवन अर्पण केलं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे, हे दुर्दैवी आहे.ते पुढे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीमध्ये आम्हीं एकत्र आलो त्यावेळी तिन्ही पक्षांनी आपले वैचारीक धोरण बदलावे असे कोणीही म्हणालेला नाही. तसे काहीही झालेले नाही. प्रत्येकाने आपली राजकीय विचारसरणी सोडावी असं आम्हीं बोललो नाही. त्यामुळें कोणी कुठं जायचं तो त्यांचा अधिकर आहे.