विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजले भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर स्कुल


विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजले भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर स्कुल
पिंपरी, प्रतिनिधी :
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्या निकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता.
प्रशालेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पूजा पोटेल्लीवार, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षिका बिसमिल्ला मुल्ला, शिक्षिका सुषमा शिरावले, प्रीती पाटील , सुमित्रा कुंभार, ज्योती फरतीयां, श्रद्धा पांढरे, दीपा गायकवाड आदींसह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या बालकांचे स्वागत शिक्षकांनी मोठ्या थाटात केले. प्रवेशद्वारावर फुलांची आरास, रांगोळी, फलकलेखन करून वातावरण प्रफुल्लित केले होते. विद्यार्थी जणू आपण सेलिब्रेटीच आहोत, अशा थाटात वावरत होते. पहिल्याच दिवशी शाळेविषयी आपुलकी आणि आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘बॅक टू स्कूल’ हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटपही करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी कोणत्याही प्रकारचे पुस्तकी शिक्षण न देता मुलांकडून काही ऍक्टिव्हिटीज करून घेण्यात आल्या. अध्यक्षा आरती राव यांनी बालचमुंना चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. प्रणव राव यांनी कोविडच्या नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका आशा घोरपडे, मुख्याध्यापिका नीलम पवार व मुख्याध्यापिका पूजा पोटेल्लीवार यांनी मुलांना शालेय शिस्त व नियम याविषयी माहिती दिली. शिक्षिका बिसमिल्ला मुल्ला व सुषमा शिरावले यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पी.टी. हाऊसच्या नावाबद्दल म्हणजेच सावित्रीबाई फुले व पु. ल. देशपांडे यांच्याविषयी माहिती दिली.
सूत्रसंचालन श्रद्धा पांढरे यांनी, तर दीपा गायकवाड यांनी आभार मानले.