माॅब लिचिंग आणि काश्मीरी पंडितांच्या हत्या दोन्हीही सारखेच- अभिनेत्री साई पल्लवी


मला काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे?, असा सवालही तिने केला. मी तटस्थ राहणं पसंत करते. ज्यांच्यासोबत अन्याय होतो आहे, त्यांची मदत करणं. कुणी लहान कुणी मोठं असं काही नसतं, सगळे समान आहेत असं ज्या घरात शिकवलं गेलं त्या वातावरणात मी वाढले आहे.
डावे आणि उजवे यांच्याविषयी मी ऐकलं आहे. पण त्यांच्यात कोण योग्य कोण अयोग्य हे मला सांगता येणार नाही, असंही ती म्हणाली.जर तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर डावे किंवा उजवे असाल तरीही न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता, असंही साई पल्लवीने म्हटलं आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही तीच्या एका वक्तव्यामुळे वादात सापडली आहे. तिचा येणारा अगामी चित्रपट विराट पर्वम या चित्रपटाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीत बोलताना माॅब लिचिंग आणि काश्मीरी पंडितांच्या हत्या दोन्हीही सारखेच, असं वक्तव्य तिने केलं आहे