मात्र मी बोलणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

राज्यातील सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये. देहूतील कार्यक्रमांमधून वाद निर्माण करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं होतं, मात्र मी बोलणार नाही असं अजित पवार यांनी आधिच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अजित पवार यांच्या अपमानाचा विषय नाही, असंही पाटलांनी स्पष्ट केलं आहेभाजप प्रदेश कार्यालयात आज भाजप नेत्यांची बैठक पार पडली आहे.

विधान परिषद निवडणूक आणि लोकसभा प्रवास अभियानाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची बैठक झाली आहे. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. यामध्ये झालेल्या चर्चेसंदर्भात ते म्हणाले, विधान परिषदेत भाजपचा गुलाल उधळला जाणार आहे. भाजपमध्ये जातीचे राजकारण होत नाही. विधानपरिषदेसाठी पूर्व योजना तयार केली असून त्यावर या बैठकीत चर्चा केली आहे

संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं नसल्यानं सत्ताधारी नेत्यांनी भाजपाला धारेवर धरलं आहे. या पार्श्वभूमीवर वादाला तोंड फुटलं असून यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, देहु येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही, यावरून वादाला तोंड फुटल होतं.

Latest News