मला केलेली अटक बेकायदेशील असून, व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसान भरपाई मिळावी: केतकी. चितळे


मुंबई :. पहिल्यांदा जेव्हा तिला कोर्टासमोर हजर करण्यात आले आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे म्हटले होते. केतकीनं जामीन मिळावा यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. त्यानंतर आता तिनं पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाकडे मला केलेली अटक ही बेकायदेशील असून आपल्याला जामीन मिळावा अशी विनंती कोर्टाला केली आहे. याशिवाय व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केतकीनं याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात केली .
केतकीनं यापूर्वी देखील हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. आता एएनआयनंकेलेल्या व्टिटमध्ये तिनं पुन्हा नव्यानं हायकोर्टामध्ये सुटकेसाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. केतकीनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरुन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती
. केतकी ही तिच्या वादग्रस्त पोस्टसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. ती अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियामुळेच जास्त चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती. पवारांवर वाईट शब्दांत टीका करणाऱ्या केतकीच्या त्या पोस्टनंतर राज्यभर तिच्याविरोधात आंदोलनं झाली होती. तिच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
त्या सगळ्या तक्रारींची नोंद घेऊन (entertainment news) एकत्रितपणे त्या गुन्ह्यांचा तपास पोलीसांनी सुरु केला. आता केतकी चितळेनं आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे