नॅशनल पब्लिक स्कुल ची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम


पुणे :
कात्रज जाधवनगर येथील अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट च्या नॅशनल पब्लिक स्कुल ने दहावी परीक्षेत सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सय्यद मुक्तेजा तय्यब अली हिने ९०.८० टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर यादव सचिनकुमार रामनरेश याने ७८.६० टक्के गुण मिळवून द्वीतीय क्रमांक पटकावला. महेश ज्योतिबा थारकर ने ७७.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
मुख्याध्यापक अंजुम फिरदोस पटेल आणि संस्थापक अध्यक्ष अॅड.तारिक अन्वर पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अक्सा चॅरिटेबल ट्रस्ट ही अल्पसंख्यांक शिक्षण कायद्याखाली नोंद झालेली शिक्षण संस्था असून गरीब ,सर्व साधारण कुटुंबातील विद्यार्थी येथे शिकतात .