तुमच्यात दम असेल तर ईडीला चौकशी करायला सांगा- खासदार उदयनराजे


सातारा :. मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. जे कोण काय बोललं मला माहिती नाही.मंत्री, संत्री असतील. त्याचे मला काहीही घेणे देणं नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर चौकशी ईडीला करायला सांगा. उगाच फालतू दोन लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप करू नका माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की तो घरचा आहेर बोलले जाते. पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. मंत्री, संत्री कोण काय बोललं मला माहित नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी करायला ईडीला सांगा, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे यांनी सांगितले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माण, खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना साताऱ्यात एमआयडीसीमध्ये उद्योग का आले नाहीत याचे कारण सांगताना अप्रत्यक्षपणे उदयनराजेंवर आरोप केले होते.
त्याला आज उदयनराजेंनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले आहे. खासदार उदयनराजे म्हणाले, माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की तो घरचा आहेर बोलले जाते. पण तुम्ही काम करा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की लोक लुटारू आहात, हे एकदा ठरवा. सत्ता आज आहे आणि उद्या नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे काम आहे. ही लोक पदावरून जातात त्यावेळी कार्यालयातील स्टाफही त्यांना ओळख देत नाही.
पण आपले तसे नाही, आपली स्टाईल इज स्टाईल, असे म्हणत त्यांनी कॉलर उडवली.एमआयडीसीची स्थापना झाली त्यावेळी मी तर शाळेत होतो, त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे सांगून उदयनराजे म्हणाले, त्यावेळी एमआयडीसीला परवानगी दिली जात होती.
डी झोन, सेंटर दिले जात होते. त्यावेळी मी नव्हतो. पण मी आल्यापासून ज्यांची जबाबदारी होती, त्यांनी ती का पार पाडली नाही. तुमच्याकडून लोकांची अपेक्षा होती. केवळ सातारा जिल्ह्यातील एमआयडीसी असली तरी त्यावेळचे खासदार, आमदार यांनी का लक्ष दिले नाही, असा प्रश्न त्यांनी केलाएमआयडीसीत जागा विकत घ्यायची असेल तर कोणी घेतली. एमआयडीसीची लेआऊट तयार होतो. त्यावेळी विविध सुविधांसाठी जागा आरक्षित केली जाते
. त्या व्यतिरिक्त प्लॉट विकत घ्यायचे आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाकडून परवानगी आणून तिचे निवासी जागेत रूपांतर करून घ्यायचे, असा प्रकार त्यांनी केला. आता माझ्यावर खंडणी मागतात, असा आरोप करत आहेत.उदयनराजे म्हणाले, १९७४ मध्ये सातारा एमआयडीचीसी स्थापना झाली. त्याच वेळी नगरची ही झाली. आता सातारा एमआयडीची दुरवस्था का झाली. कोणी दुर्लक्ष केले. दुसऱ्यावर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार झाला. त्यावेळी एल ॲण्ड टी फॅक्टरी येणार होती, ती सिन्नरच्या माळावर का गेली हे आता त्यांनाच विचारा. येथील साईट सोडून बाहेरच्या जिल्ह्यात कंपन्या का गेल्या याला कोण कारणीभूत असा, प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला आहे