मिशन एज्युकेशन सपोर्ट वारियर्स मुंबई यांच्या अंतर्गत ग्रामीण भागातील १०० मुलांना शैक्षणिक किट वाटपाचा कार्यक्रम


मिशन एज्युकेशन सपोर्ट वारियर्स मुंबई यांच्या अंतर्गत ग्रामीण भागातील १०० मुलांना शैक्षणिक किट वाटपाचा कार्यक्रम श्रीमती रावजी शेठ जाधव हायस्कूल किंजळेतर्फे खेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मा.श्री.अनिल झोरे साहेब (EX-L&T संस्थापक, संचालक. ज्ञानमंदिर हायस्कूल), माननीय मा.श्री.सागर बोरनारे साहेब (CBI Gazzetted अधिकारी ), मा.श्री. हरिबा सोनवणे (BMC अधिकारी ), मा.सौ. रागिनी झोरे मॅडम ( संचालिका ज्ञानमंदिर हायस्कूल), किंजळे हायस्कूलचे मुख्याध्यापक मा.श्री जाधव सर, मा.श्री रामचंद्र आखाडे (सामाजिक कार्यकर्त), मा.श्री धोंडू गोरे (सामाजिक कार्यकर्ते), कु.राहुल शांताराम ढेबे (सामाजिक कार्यकर्ते),मा.श्री.कैलास शिर्के (सामाजिक कार्यकर्ते) कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.दर्षणा मोरे माजी सरपंच शृतिका चव्हाण, तसेच उपस्थित सर्व मुख्याध्यापक, शिक्षक,पालक, आणि विद्यार्थी ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
मिशन एज्युकेशन सपोर्ट वॉरियर्सच्या माध्यमातून खेड तालुक्यातील ५ शाळेना किट वाटप करण्यात आले.त्यामध्ये किंजळे हायस्कूल, जिल्हा परिषद किंजळे तर्फे खेड शाळा, आस्तान नंबर एक शाळा, जिल्हा परिषद धवडे शाळा, जिल्हा परिषद मिरले शाळा या सर्वाना मिशन एज्युकेशन सपोर्ट वॉरियर्स च्या वतीने कीट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खोत सर यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन श्री शिरकर सर यांनी मानले. सहकार्य व मदतीबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार🙏