२५ जून रोजी ‘ गाणारी वाद्ये’ चे सादरीकरण भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ः

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ गाणारी वाद्ये ‘ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘ सिनर्स पुणे ‘ आयोजित विविध वाद्यवादनाची ही संगीतमय मैफल असून लावणी, भावगीत, हिंदी गाण्यांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. उपेंद्र लक्ष्मेश्वर यांचे संगीत संयोजन असून १२ कलाकार सहभागी होणार आहेत.हा कार्यक्रम शनीवार, २५ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.

हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १२६ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.