56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला बसणार – रवी राणा


मुंबई | राज्यसभेत संजय पवारांना जी मतं मिळाली ती एकनाथ शिंदेंच्या मेहनतीमुळे मिळाली. मात्र, एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवून शिवसेनेनं ज्या पद्धतीनं विधानपरिषद निवडणुकीची आखणी केली ते पाहता शिवसेनेचा एक उमेदवार 100 टक्के पडणार आहे, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.दरम्यान, रवी राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर गेल्या 56 वर्षात जे घडलं नाही असा धक्का शिवसेनेला बसणार आहे, असं वक्तव्य देखील रवी राणा यांनी केलं आहे.विधानपरिषद निवडणुकीसाठीआज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात उतरल्याने चुरस पाहायला मिळत आहेराजकीय वातावरण तापलं असताना मतांच्या गणितावरून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाची चिन्हं दिसत असताना आमदार रवी राणायांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे