सगळ्या आमदारांची मते वैध, त्यामुळे सगळ्याच पक्षांना दिलासा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council election) महाविकास आघाडीने ६ उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये२ उमेदवार आहेत. भाजपने पाच उमेदवार या निवडणुकीत उतरवले आहेत. यामध्ये काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यामध्ये थेट लढत आहे. सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना मतदान करण्याविषयी ट्रेनिंग दिले होते. त्यामुळे एकही मत बात झाले नाहीमुंबई भाजपच्या (BJP) दोन मतांवर काँग्रेसने (Congress)  :घेतलेले आक्षेप फेटाळ्यानंतर २ तासांनी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला वैध आणि अवैध मते मोजली गेली. त्यामध्ये सगळ्या आमदारांची मते वैध ठरली आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांना दिलासा मिळाला आहे.या निवडणुकीत उमेदवारांना विजयी होण्यासाठी २६ मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे, भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस कडून रामराजे रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेकडून आमशा पाडवी, सचिन अहिर निवडणुकीच्या रिंगणात आहेतदरम्यान, सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. त्यानंतर २८५ आमदारांनी मतदान केले आहे. चिंचवड विधानसभेचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी राज्यसभा निवडणुकी प्रमाणेच रुग्णवाहिकेतून येवून आपला मतदानाचा हक्क बजावला.

Latest News