रात्री नऊ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल हाती येण्याची शक्यता….

मुंबई :. शिवसेनेने आपल्या पहिल्या पसंतीच्या आमदाराला ३२ मतांचा कोटा दिला आहे. तर भाजपने ३० मतांचा, काँग्रेसने २९ आणि राष्ट्रवादीने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवारांसाठी २९ मतांचा कोटा ठरवल्याची माहिती आहे.राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राज्यसभेच्या फटक्यानंतर आता महाविकास आघाडी सावध झाली असून मागच्या विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असंच चित्र दिसत आहे.
मतांच्या छाननीनंतर सर्व आमदारांची मत वैध ठरली आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. लवकरच पहिला निकाल समोर येणार आहे रात्री नऊ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल हाती येण्याची शक्यता असून सर्व पक्षांनी विधानभवनाबाहेर गर्दी केली आहे. तर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे.मतमोजणीला सुरूवात झाली असून लवकरत निकाल हाती येणार आहे.
सर्वांची उत्कंठा शिगेला लागली असून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीचे १३ मत ट्रान्सफर केल्याचं समोर आलं आहे काँग्रेसने भाजपाच्या दोन मतांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती पण त्यांनी काँग्रेसची तक्रार फेटाळून लावली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानेही ही तक्रार फेटाळून लावली आणि अखेर दोन तासानंतर मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दरम्यान भाजपने मतांचा पसंती क्रम बदलला असून प्रसाद लाड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर आता भाजपच्या चोथ्या उमेदवार उमा खापरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.भाजपने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना मतदानाला बोलावणे हे असंवेदनशील असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहें
काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला आहे. त्यानंतर या अधिकाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असल्याचं काँग्रेसने सांगितलं आहे.काँग्रेसचा भाजपच्या मतांवर केलेला आक्षेप निवडणूक आयोगाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी फेटाळले असून हा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे. दरम्यान काँग्रेसच्या आक्षेपावर भाजपची उत्तर देण्याची तयारी असून आम्ही रीतसर परवानगी काढली होती असं भाजपने सांगितलं आहे.काँग्रेसच्या आक्षेपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक सुरू झाली आहे. काँग्रेसने आयोगाकडे तक्रारीचा मेल केला होता. आयोगाच्या निकालानंतर मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
विविध पक्षांचे उमेदवार खालीलप्रमाणे –
भाजपा – राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड
शिवसेना – आमश्या पाडवी, सचिन अहिर
राष्ट्रवादी – रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे
काँग्रेस – चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप
काँग्रेसने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतल्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता आहे.सुधीर मुनगंटीवार : काँग्रेसला पराभव दिसत असल्याने त्यांच्याकडून आरोप केले जात आहेत
थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार असून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतावर काँग्रेसने आरोप घेतला आहे. त्यांची मतपत्रिका इतर सहकाऱ्यांनी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.विधान परिषदेसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झाले आहे. ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी प्रत्येकी २६ मतांची गरज आहे.
सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा मिळालेला नाही. विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला शेवटचा अर्धा तास शिल्लक असतानाही सुप्रीम कोर्टाने सुनावणीवर निकाल जाहिर केला.विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना विधानभवनात भेटीगाठींचा जोर वाढला आहे.
कॉंग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांची घेतली भेट.दुपारी 3 वाजेपर्यंत 279 जणांचं मतदान, अद्याप सहा आमदारांचं मतदान बाकी आहे. मतदानासाठी केवळ ५० मिनिटं उरली आहेत. राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार यांच मतदान राहिलं आहे.विधानपरिषद निवडणूक : दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 275 जणांचं मतदान, अद्याप दहा आमदारांचं मतदान बाकी लक्ष्मण जगताप मतदानासाठी रुगणवाहिकेतून विधानभवनात दाखल झाले आहे. त्यांना काल ताप होता. मात्र जिद्दीने ते मतदान करण्यासाठी आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
पक्षाप्रती त्यांच्या कमिटमेंटला आम्ही सलाम करतो, असं फडणवीस म्हणाले.विधानपरिषद निवडणूक दुपारी १ वाजेपर्यंत एकूण मतदान २४६ पूर्णनाराजी सर्वांची दूर केली आहे. ५ वाजता चित्र स्पष्ट होईल. मतदान बाद होणार नाही याची काळजी घेतली आहे.
फोडाफोडीचे राजकारण यशस्वी होणार नाही, आमचा कोटा ठरवून आम्ही समीकरण योग्य जुळवलं आहे. मतांच्या समीकरणाचा फायदा मविआच्या सहाव्या उमेदवाराला. अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी यावेळी दिली.
भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना आणण्यासाठी गेले आहेत. मात्र, मनसेने गृहीत धरु नये असे म्हटले आहे. तसेच, पावसात कितीही भिजले तरीही निवडणुक जिंकणार नाही. पडळकरांचा राष्ट्रवादीला टोला. 161 आमदार युतीचे आहेत. चार तासात निकाल येईल. असंही पडकर म्हणाले.