भाजपचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 शिवसेनेचे 2 काँग्रेसचा एक उमेदवार विजयी…



मुंबई :विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचे सर्वच्या सर्व 5 उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 2 शिवसेनेचे (Shivsena) 2 आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले आहेत
.पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे, प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत.
तसेच काँग्रसेच पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे देखील विजयी विधान परिषद निवडणुकीत दोन मतांवरचा आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळल्यानंतर तब्बल २ तासांनंतर मतमोजणीला सुरवात झाली. यात आता पहिल्या फेरीचा निकाल घोषित करण्यात आला असून अक्षेप्रमाणे भाजपचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) २ शिवसेनेचे (Shivsena) २ आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले आहेत
. काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यापैकी नेमके कोण विजयी होणार याचा निकाल दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत लागण्याची शक्यता आहे.पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे हे विजयी झाले आहेत
. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. काँग्रसेच पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे देखील विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनी २६ मतांचा कोटा पूर्ण केला. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनीही २६ मतांचा कोटा पूर्ण केला.
यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनीही पहिल्याच फेरीत विजयाच्या २६ मतांचा कोटा पूर्ण केला. रामराजे यांचे एक मत बाद ठरुनही त्यांनी विजयाचा कोटा पूर्ण केला.