इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या शिबिरात वारकऱ्यांची आरोग्य तपासणी– मोफत वैद्यकीय शिबिरास प्रतिसाद


‘इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या शिबिरात वारकऱ्यांची आरोग्य तपासणी—————— मोफत वैद्यकीय शिबिरास प्रतिसाद
पुणे : वानवडी येथील ‘इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 23 जून रोजी हे शिबिर ७८- गुरुवार पेठ, नवयुग मित्र मंडळ, शीतळादेवी चौकाजवळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. परवेझ इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारीका, सहाय्यक वर्ग वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी झाले. या उपक्रमाचे हे अकरावे वर्ष होते…….