‘राष्ट्राच्या आणि मुलांच्या जडणघडणीतले गणिताचे स्थान’ विषयावर २५ जून रोजी शिक्षक परिषद

‘राष्ट्राच्या आणि मुलांच्या जडणघडणीतले गणिताचे स्थान’ विषयावर २५ जून रोजी शिक्षक परिषद

पुणे :पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स यांच्या वतीने ‘राष्ट्राच्या आणि मुलांच्या जडणघडणीतले गणिताचे स्थान’ विषयावर २५ जून रोजी शिक्षक परिषद आयोजित करण्यात आली आहे

.२५ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ रोजी कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या इचलकरंजी सभागृहात ही शिक्षक परिषद होणार आहे.अशी माहिती मुख्याध्यापक संघ अध्यक्ष नंदकुमार सागर, विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष रोहिदास एकाड , मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संस्थापक मंदार नामजोशी यांनी दिली.

डॉ विनायक जोशी(राष्ट्र घडणीतील गणिताचे स्थान),डॉ पंडित विद्यासागर(मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे),जयंत खेडकर(मुलांच्या जडणघडणीत गणिताचे स्थान),डॉ अश्विनी दातार (मानवी जीवनातील गणितीय प्रभाव ),डॉ पराग काळकर (एन ई पी आणि गणित ,निपुण भारत) इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत . या परिषदेला २०० शिक्षक प्रत्यक्ष तर २ हजार शिक्षक दूर दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.

Latest News