बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल- संजय राऊत


शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी,” ” बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवा,” असे आवाहन राऊत यांनी दिले.शिवसेनेच्या बंडखोर गटांच्या ताब्यातून सुटलेल्या दोन आमदारांनी आज माध्यमांसमोर त्यांच्यावर आलेल्या संकटाची माहिती दिली. “आम्हाला फसवणूक नेले,”असे एकनाथ शिंदे यांच्या गटातून आपली सुटका केलेल्या या दोन आमदारांनी सांगितले. आमदार कैलास पाटील, आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या अपहरण आणि सुटकेची कहानी यावेळी सांगितलीशिवसेनेच्या बंडखोर गटांच्या ताब्यातून सुटलेल्या दोन आमदारांनी आज माध्यमांसमोर त्यांच्यावर आलेल्या संकटाची माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला आवाहन केले.राज्यात शिवसेनेच्या मुख्य नेतेमंडळींनी बंडखोरी केल्याने शिवसेनासह महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. एकनाथ शिंदे यांचा एक मोठा गट भाजप शासित प्रदेश आसामच्या गुवाहटीत असून, दोन दिवसांपासून ते ‘रेडीसन ब्ल्यू’ या ठिकाणी तळ ठोकून आहेत. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या भाष्याबद्दल राज्याच्या राजकारणाला एक वेगळे वळण मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेने आपला मुखपत्र सामनातून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यासोबत एकनाथ शिंदे गटाला वेळीच सावध होण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.