सरकार टिकविण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करणार – जयंत पाटील

jayant-patil-05

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तसेच, शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वार प्रतिवार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलत होतेराष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक पार पडली. त्यामध्ये सध्याचा राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकार टिकावं, यासाठी चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी येथे गेलेले आमदार परत येतील, असा आम्हाला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा आहे. सरकार टिकविण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेशिवसेनेतीलबंडाच्या पार्श्वभूमीवर ‘सिल्व्हर ओक’वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची ज्येष्ठ नेते शरद पवारयांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात शक्य तेवढी आणि जमेल तितकी मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत साथ देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाकरे यांच्या निर्णयाची राष्ट्रवादी वाट बघणार असून वेळ आली तर विरोधात बसायची तयारीही राष्ट्रवादीने केली आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलयांनी बैठकीनंतर दिली.जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगल्यावर राहण्यास पूर्वी तयार नव्हते. पण, आमच्या आग्रहानंतर ते वर्षा या निवास स्थानी राहायला आले होते. त्यांनी वर्षा सोडला म्हणजे मुख्यमंत्रीपद सोडलं, असं होत नाही. शिवसेनेतून आमदार बाहेर पडतील, असे कधी वाटले नव्हते. वेळ पडली तर विरोधात बसू, असेही पाटील यांनी स्पष्ट केलेआता रडायचं ठरवलं आहे. तर अशी अनेक कारणे आता देता येतात. गुवाहाटीत गेलेले सगळी मंडळी शिंदे गटात सामील व्हाययला गेली, असं नाही. त्यातील काही जण माहिती घ्यायला गेले आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.जमेल तितकी मदत उद्धव ठाकरे यांना करायची. जे शक्य आहे, ते करण्यात येईल, त्यांना साथ द्यायची. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाची वाट राष्ट्रवादी बघणार आहे. वेळ पडली तर विरोधात बसायची तयारीही राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे

Latest News