तुमच्या नम्रपणाने तुमच्या पक्षातील असंतुष्टांना जोरदार चपराक :खासदार इम्तियाज जलिल

मुंबई :. शिवसेनेसोबत आमचे राजकीय मतभेद जरुर असतील, पण त्यांची भूमिका ऐकूण आणि स्पष्टोक्तेपणा पाहून त्यांच्याबद्दलचा आदर आणखीन वाढला. तुमच्या नम्रपणाने तुमच्या पक्षातील असंतुष्टांना जोरदार चपराक दिली आहे,असे मत खासदार इम्तियाज जलिल व्यक्त केले आहें

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या फेसबूक लाईव्हच्या संवादात केलेला स्पष्टोक्तेपणा चर्चेत आला आहे. यावर खासदार इम्तियाज जलिल यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचा स्पष्टोक्तेपणा त्यांना आवडला असून त्यांनी काहीशी भावूक प्रतिक्रिया दिली. जलिल म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सच्चाईचं कौतुक आहे.

,शिवसेना आणि हिंदुत्व कदापी एकमेकांपासून दुर राहू शकत नाही, कारण हिंदुत्व आमच्या श्वासात आहे. आम्ही सतत संघर्ष केलेला आहे. मी कोणत्याही आव्हानाला घाबरत नाही. शिवसेनेच्या सुरतमधील आमदारांनी मला भेटावं, स्पष्ट सांगावं, मी मुख्यमंत्री पदाचाच काय शिवसेना पक्षप्रमुख पदाचा देखील राजीनामा द्यायला तयार आहे, असं म्हटलं आहे.

 एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाळीमुळे राज्यात मोठी धुमश्चक्री निर्माण झालेली आहे. त्यात आता मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे हे देखील वेळोवेळी सामाजिक माध्यमांवर भाष्य करुन आपली बाजू मांडत आहेत. शिवसेनेने आपल्या सर्व नेत्यांना मुंबईत येण्यासाठी अधिकृत पत्रक पाठवलं आहे. त्याला शिंदे गटाकडून नकारात्मक प्रतिसाद आला आहे

Latest News