नागरिकांनी 30 जून पर्यंत मालमत्ता कर सवलतीचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांचे आवाहन


नागरिकांनी 30 जून पर्यंत मालमत्ता कर सवलतीचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांचे आवाहन
पिंपरी, 24 जून 2022 :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत विविध मालमत्तांना वेगवेगळ्या सवलती जाहिर करण्यात आलेल्या आहेत. यापैकी कुठल्याही सवलतीचा लाभ घ्यावयाचा असेल तर 30 जून पुर्वी आपल्या संपुर्ण मालमत्ता कराचा भरणा करून नागरिकांनी सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालमत्ता कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.

महापालिकेच्या वतीने महिलांना सामान्य करामध्ये 50 टक्के सवलत, दिव्यांगांना सामान्य करातध्ये 50 टक्के सुट, माजी सैनिकांना मालमत्ता करात संपुर्ण सवलत तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यास 5 टक्के सवलत देण्यात येते. 30 जून पूर्वी आगाऊ भरणा करणाऱ्या नागरिकांना सामान्य करात 10 ‍ टक्के सुट देण्यात येते. तसेच पर्यावरण पुरक इमारतींना व पर्यावरण पुरक निवासी मालमत्तांनी पर्यावरण पुरक उपक्रम राबविल्यास त्यांना सुट मिळते. यामध्ये, पर्यावरण पुरक मालमत्तांना 10 टक्के, आगाऊ भरणासाठी 10 टक्के तसेच ऑनलाईन भरण्यासाठी 5 टक्के असे एकुण 25 टक्कांपर्यंत सवलत दिली जाते. सवलत घेण्याची शेवटची तारिख 30 जून 2022 असून सर्व नागरिकांनी मालमत्ता कर सवलतीचा लाभ घेणे आवश्यक आहे.
गतवर्षी ज्या नागरिकांचे धनादेश अनादर झालेले आहेत. त्यापैकी अनेक लोकांने मनपाकडे भरणा केलेला आहे. मात्र ज्या लोकांनी अद्याप पर्यंत भरणा केलेला नाही. अशा नागरिकांनी नियम 138 अन्वये म्हणजे ज्यामध्ये फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल होतो. या नियम 138 अन्वये नोटीस पाठविलेली आहे. ज्यांचे उत्तर मिळालेले नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हाची दाखल करणेची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर गेल्यावर्षी ज्या मालमत्तांना जप्ती पूर्व नोटीसा दिलेल्या होत्या. त्यामधील ज्या लोकांनी अद्याप पर्यंत कराचा भरणा केलेला नाही. अशा मालमत्तांची 1 जुलै 2022 पासुन जप्तीची कार्यवाही सुरु करणार असुन त्यामध्ये जप्ती कार्यवाही कामी महाराष्ट्र सेकुरीटी फोर्स व क्षेत्रीय कार्यालयाकडील संपुर्ण टीम अशा प्रकारे कार्यवाही करण्यात येणार आहे. अशी अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी नागरिकांनी कराचा भरणा करणे आवश्यक आहे.

याचबरोबर अशा स्वरुपाची कार्यवाही करत असताना काही दंडनिहाय कार्यवाही असल्यास त्याचाही विचार मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने जे नागरिक प्रामाणिकपणे मालमत्ता करा भरणा करित आहेत. त्यांना सवलत योजना व जे नागरिक कराचा भरणा करीत नाही त्यांच्यासाठी जप्तीची कार्यवाही असे दुहेरी कार्यवाही करण्यात येत आहे.

Latest News