भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा गाणारी वाद्ये’ कार्यक्रमात रसिकांनी लुटला मनमुराद आनंद, गाणाऱ्या वाद्यांच्या दुनियेत हरवले रसिक जन !


‘ गाणारी वाद्ये’ कार्यक्रमात रसिकांनी लुटला मनमुराद आनंद
…………………………….
गाणाऱ्या वाद्यांच्या दुनियेत हरवले रसिक जन !
——————————– ‘
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ गाणारी वाद्ये ‘ या कार्यक्रमाला शनिवारी सायंकाळी रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘ सिनर्स पुणे ‘ आयोजित विविध वाद्यवादनाच्या या संगीतमय मैफलीत लावणी, भावगीत, हिंदी गाण्यांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले होते.
उपेंद्र लक्ष्मेश्वर यांचे संगीत संयोजन असलेल्या या कार्यक्रमात १२ कलाकार सहभागी झाले होते.
‘ग साजणे’, ‘बुगडी माझी’, ‘बेकरार करके हमें’ , ‘सूर तेच छेडीता’, ‘सावरे सलोने’,’ अखेरचा हा तुला’, ‘ऐ दिल मुझे बतादे’, ‘कुन्या गावाच आलं’ , ‘लग जा गले’,’ केव्हा तरी पहाटे’, ‘दिल तडप तडप के’, ‘याद न जाए’, ‘ही चाल तुरु तुरू’ , ‘मुंगळा’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ अशा बहारदार गाण्यांच्या वाद्यवादनाची संगीत मैफल सजली. जयंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
हा कार्यक्रम शनीवार, २५ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १२६ वा कार्यक्रम होता.
मेलडी मेकर्स चे इकबाल दरबार , गायक शशांक दिवेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. सहभागी सर्व कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला.