गेल्या अडीच वर्षांत विरोधकांनी खूप त्रास दिला – भाजपचे खासदार धनंजय महाडिक

सोलापूर : मागील दोन-अडीच वर्षांत विरोधकांच्या गटाकडून खूप त्रास देण्याचा प्रयत्न झाला. अगदी भीमा सहकारी साखर कारखाना सुरू होऊ नये, यासाठीही प्रयत्न झाले. पण मीही आता खासदार झालो असून सत्तेत आलो आहे. तुम्ही पुन्हा आम्हाला त्रास दिल्यास आम्हालाही तशीच भूमिका घ्यावी लागेल, असा मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी पुळूज मतदारसंघातून, तर त्यांचे चिरंजीव विश्वजित महाडिक यांनी सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

त्यामुळे तुम्ही मला त्रास देऊ नका, असे आवाहन मी संबंधितांना केले आहे. मला पुन्हा त्रास दिला तर, मलाही त्या पद्धतीची भूमिका घ्यावी लागेल. तशी संस्कृती व परंपरा आमची नाही. पण, ती भूमिका घेण्यास भाग पडले तर तुम्हालाच ते अडचणीच ठरले

. तुम्ही ज्या संस्था चालवता, त्या आता अडचणीत आहेत आणि त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्य सहभागी आहेत. आम्ही जर तशी भूमिका घेतली तर तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो, असा इशाराही धनंजय महाडिक यांनी दिला आहे

. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी त्यांचे अर्ज स्वीकारले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या पाटलांना इशारा दिलाखासदार महाडिक म्हणाले की, भीमा साखर कारखान्याला विरोधकांच्या गटाकडून मागील दोन-अडीच वर्षांत खूप त्रास देण्याचा प्रयत्न झाला आहे. भीमा कारखाना सुरू होऊ नये, यासाठीही प्रयत्न झाले होते.

अनेकांच्या मार्फत तक्रारींसह उच्च न्यायालयात खटले दाखल करण्यापर्यत त्यांची मजल गेली आहे. पण, भाजपच्या मदतीने मीही आता खासदार झालो आहे, त्यामुळे मीपण सध्या सत्तेत आलो भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शेतकरी हितासाठी बिनविरोध करू, त्यासाठी आपण मदत करावी, असे आवाहन आपण माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राजन पाटील या दोघांनाही केले आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Latest News