ठाकरे सरकारने 48 तासांत बहुमत सिद्ध करावे: बच्चू कडू करणार?


भाजप नेते सध्या पुढे येण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे यासाठी ते दुसरा मार्ग निवडू शकतात राज्यपालांना भेटून सरकारने ४८ तासांत बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी बच्चू कडू करणार असल्याचे सूत्र सांगतात.
त्यामुळे या बंडाळीमध्ये उद्या महत्वपूर्ण घडामोडी होण्याची दाट शक्यता आहे. बच्चू कडू यांच्यासोबत त्याचे सहकारी काही अपक्ष आमदारही राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत अमावस्या आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा स्वतंत्र पक्ष आहे,
त्यांचे दोन आमदार आहेत. त्यामुळे ते अविश्वासाचे पत्र राज्यपालांना देऊ शकतात. त्यामुळे मग भाजपला पुढे येण्याची गरज नाही. शिवसेनेचे आमदार जर आले तर त्यांना हिंदुत्व महत्त्वाचं होतं की सरकार पाडणं महत्त्वाचं होते, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळेच बच्चू कडूंसोबत अपक्ष आमदार असण्याची शक्यता जास्त आहे. त्यांच्या मागणीनंतर फ्लोर टेस्ट झाली तर भाजप आपलं संख्याबळ दाखवू शकते. आणि त्याचे संख्याबळ जास्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही सर्व प्रक्रिया अमावस्येकरता थांबली असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे उद्या सकाळी ८.३० वाजतानंतरच्या घडामोडी महत्वाच्या राहणार आहेत.मला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे आर्शीवाद आहेत.
त्यांचेच हिंदुत्व घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. महाविकास आघाडीतील मित्रपक्षाचे लोक शिवसेना संपवण्याचे काम करीत आहेत. हे आम्हाला पटलं नाही. म्हणून आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. हे बंड नाही, तर ही मोहीम आहे आणि ही मोहीम आम्ही सर्व मिळून नक्कीच फत्ते करू, असे एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते
. त्यामुळे आता सत्ता स्थापनेची घडी निकट आली असल्याचीही चर्चा आहे.तब्बल आठवडाभरापासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह पहिले सुरत आणि त्यानंतर आसाममधील गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसले आहे. आज दुपारी ते पहिल्यांदा प्रसार माध्यमांसमोर आले. उद्या मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, पण आता ते नाही तर प्रहारचे बच्चू कडू उद्या मुंबईला जाणार असल्याची माहिती आहे.उद्या राज्यपालांकडे अविश्वासाचे पत्र देऊ शकते.