12 जुलैपर्यंत शहरातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्टी वगळता सर्व सुट्ट्या रद्द….

मुंबई : राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. १२ जुलैपर्यंत शहरातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्टी वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजपासून (२८ जून) ते १२ जुलै पर्यंत पोलिसांना ऑन ड्युटी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यात ताणावाचे वातावरण आहे. बंडखोर नेत्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दूसरीकडे काही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटालाही समर्थन दिले आहे.
यामुळे शिंदे समर्थक आणि विरोधकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. राज्यात ठिकठिकाणी याचे पडसादही उमटल्याचे पाहायला मिळाले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 12 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीला पुन्हा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे
. आठवड्याभरानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईत येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिंदेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्र देणार असल्याची माहिती पुढे. येत आहें
शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पुण्यातही कोथरूडसह काही भागात संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ला केला होता. पुण्यात सदाशिव पेठेतील एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिदे यांच्या तर्फे उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या बोर्डाला काळे फासण्यात आले
. त्यांचे कार्यालयही शिवसैनिकांनी फोडले. त्यांच्या फोटोला काळे फासले. तर शिवसेनानेते आमदार तानाजी सावंत यांच्याही कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला करत तोडफोड केली. शिवसैनिक त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत.