राज्य सरकाकडे बहूमत नसून त्यांना आपलं बहूमत सिद्ध करायला सांगाव-देवेंद्र फडणवीस

राज्यपाल भगत सिंग कोशारी पत्र या पत्रासोबत आम्ही सर्वाच्च न्यायालायाने दिलेल्या काही निर्णयांचा उल्लेख केलेले संदर्भ दिले आहेत. त्या निर्णयानुसार राज्यापाल योग्य निर्णय घेतील असा आपणाला विश्वास आहे. तसंच ई-मेलद्वारे देखील आपण राज्यापालांना पत्र दिलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितंल.त्यामुळे आता राज्यपाल विशेष अधिवेशन बोलवणार का आणि ते कधी? याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. शिवाय येत्या ३० जूनलाच हे विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आज रात्री उशिरा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर यांच्यासह राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेऊन बाहेर आल्यावर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी फडणवीस म्हणाले, ‘ आज आम्ही राज्यपालांना एनडीएद्वारे एक पत्र दिलं आहे. या पत्रामध्ये राज्यातील सध्याची परिस्थिती आहे, ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत त्यानुसार शिवसेनेचे ३९ आमदार बाहेर आहेत.काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आम्हाला सरकारमध्ये राहायचं नाही असं ते आमदार म्हणत आहेत. अशा परिस्थित राज्य सरकाकडे बहूमत नसून त्यांना आपलं बहूमत सिद्ध करायला सांगाव अशी विनंती करणार पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांना दिलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितंल.

Latest News