सर्वोन्यायालयाने नुपूर शर्मांवर आज ताशेरे ओढले…


न्यायालयाने त्यांना टीव्हीवर जाऊन माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. शर्मा यांनी माफी मागण्यास प्रचंड विलंब केला. शिवाय, सशर्त माफी मागितली आहे. त्यांच्या याचिकेत उद्धटपणा दिसतो. त्यांनी टीव्ही माफी मागायला पाहिजे होती, असं स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. तसेच जर निवेदीकाने त्यांना भरीला पाडलं असेल तर त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायलयाने दिले. पक्षाच्या प्रवक्त्या आहात म्हणजे काहीही बोलता येईल असं समजू नका, असा दम सुद्धा न्यायालयाने त्यांना दिला.भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात प्रेषित मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने नुपूर शर्मांवर ताशेरे ओढले आहेतशर्मांची जीभ घसरली. त्यांच्या बेताल वक्तव्याचा परीणाम म्हणून देश पेटला. आणि उदयपुर हत्याकांडासारखी दुर्दैवी घटना घडली. नुपूर शर्मा यांनी तात्काळ माफी मागत आपले वक्तव्य मागे घेतले असल्याचे त्यांचे वकील मनिंदर सिंह यांनी सांगितलं. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे भारताची इस्लामिक राष्ट्रांत नाचक्की झाली होती. कतार, कुवैत आणि इराणचं भारतीय राजदुतांना समन्स मिळाले होतेनुपूर शर्मा यांनी देशात विविध ठिकाणी दाखल झालेले गुन्हे दिल्लीत हस्तांतरीत करण्याची मागणी केली होती. त्याला न्यायालयाने नकार दिला. मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची चौकशी आहे, तशीच त्या त्या ठिकाणी सुरु राहणार असं न्यायालयाने म्हटलं.