आदरणीय चित्राताई आपण गुलाबराव पाटलांचे गाल लाल करणार होतात…. ताई, आपण आपलं वचन पाळावं,

आता शिंदे गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने आरोप करणारे आणि आरोपी एकाच छताखाली आले आहेत. त्यामुळे आता भलताच पेच तयार झाला आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते रविकांत वर्पे यांनी यावरू चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. आदरणीय चित्राताई आपण गुलाबराव पाटलांचे गाल लाल करणार होतात. जे आता आपल्या सरकारमध्ये मंत्री होऊ इच्छित आहेत. ताई, आपण आपलं वचन पाळावं, असं ते म्हणालेत.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील किरीट सोमय्या यांना कोपरखळी मारत किरीट सोमय्या आता बेरोजगार झाले अशी टिका केली होती. शिवसेना आणि भाजप आमदारांची ही युती किती वेळ राहिल आणि आता ते आरोप कोणावर करतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या 39 आमदारांसह पोबारा केला. त्यानंतर दहा दिवस सत्ता आणि नाराजीनाट्य करत शेवटी भाजपशी युती करत शिंदेंनी सरकार स्थापन केलं. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये खातेवाटप होणं अद्याब बाकी आहे. तेव्हा राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री होण्यासाठी शिवसेना आणि भाजपचे बरेच आमदार उत्सुक आहेतमहाविकास आघाडी सरकार पडण्याअगोदर भाजप विरोधी पक्षात होता. त्यावेळी भाजप आणि मविआ सरकारचे वाद नेहमी चव्हाट्यावर यायचे. भाजप नेते किरीट सोमय्या, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नेत्या चित्रा वाघ आदी मंडळी सतत मविआ सरकारवर आणि नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एकदा महाविकास आघाडी सरकारमधील पाणी पुरवठा मंत्री गुलाब पाटील यांचे गाल लाल करू,