महाविकास अघाड़ी विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव जाहीर…

मविआ मधून विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. राजन साळवी आमदार होण्यापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. 2009 पासून सलग तीनवेळा राजापूर मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. शिंदेच्या बंडानंतर राजन साळवी यांची उपगटनेतेपदी निवड करण्यात आली होतीभाजपकडून राहूल नार्वेकर यांचं नाव जाहिर करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजण साळवी विरूद्ध राहूल नार्वेकर अशी लढत असेल. ही लढत चुरशीची असणारा आहे. राहूल नार्वेकर यांच्याकडे 170 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. असं असतानाही या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. ही निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. आता या निवडणुकीत पुन्हा काय राजकीय होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत फार्म भरण्याची मुदत होती. अखेरच्या राहिलेल्या अर्ध्या तासात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी कडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे

Latest News