ज्यांनी माझी टिंगलटवाळी केली, त्यांना मी माफ केले…

आमच्या काळात सुरू झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पात एकनाथराव शिंदे यांनी अतिशय मोठे योगदान दिले. आरोग्य खात्यात सुद्धा त्यांनी अतिशय चांगले काम केले. शिंदे हे एक वेगळे रसायन आहे. 24*7 काम करणारा हा नेता आहे. माणुसकी असलेला हा नेता आहे. ज्याचा कुणी नाही, त्याचा मी आहे, ही आनंद दिघे साहेब यांची शिकवण, तोच कित्ता एकनाथराव शिंदे हे आज पुढे नेत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकावरील विश्वासदर्शक ठराव आज मंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी जोरदार भाषण केले. शिंदे यांचे वारेमाप कौतुक त्यांनी केले. तसेच हे सरकार ईडीमुळे आल्याचा विरोधकांचा आरोप खरा असल्याचे सांगत पण हे ईडी म्हणजे एकनाथ-फडणवीस असे आहे, असा दावा त्यांनी केला.विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी व्यक्त केलेले मनोगत पुढीलप्रमाणेअतिशय कष्टाने एकनाथराव शिंदे यांनी आपले आयुष्य उभे केले. स्वतच्या जीवनात अनेक कटू प्रसंग आले, पण न थकता त्यांनी आयुष्य उभे केले. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हा निर्धार मोलाचा आहे.नंदुरबारहून आदिवासींचा मोर्चा निघाला तर त्यावेळी आमच्या इतर नेत्यांसोबत एकनाथराव शिंदे मोर्चेकऱ्यांच्या व्यवस्थेत धावले. मोर्चा विरोधात असला तरी त्यांची काळजी घेतली पाहिजे, हेच आमचे धोरण होते. कुणी विरोधात आहे, म्हणून छळ करायचा हे आमचे धोरण कधीच नव्हते.ज्यांनी माझी टिंगलटवाळी केली, त्यांना मी माफ केले आहे. त्यांना माफ करणे हाच त्यांचा बदला आहे.सत्ता हे आमच्यासाठी केवळ साधन आहे. आमची खंत एकच होती, की जनतेने जनादेश देऊन सुद्धा एक विचित्र आघाडी जन्माला घातली गेली. त्यांचा अपमान केला गेला.मी कुणाला उपमा देत नाही, पण जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते, तेव्हा कोणाला तरी चाणक्य बनून चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ती व्यवस्था ध्वस्त करावी लागते.मी नशीबवान आहे की माझे मुंबईत घर नाही. त्यामुळे माझे घर तुटले नाही आणि सरकारविरुद्ध आवाज उठवू शकलो.महाराष्ट्राचे राजकारण वेगळे आहे. कुणी किती मोठे विरोधक असले तरी आपण एकमेकांकडे जातो. हे राजकारण असेच असले पाहिजे. सत्तेचा अहंकार डोक्यात जाऊन उपयोग नसतो. मध्यंतरीच्या काळात अनेक दुर्दैवी घटना महाराष्ट्राने अनुभवल्या.

Latest News