काळजी करू नका, धमक्या आम्हालाही देता येतात…

पण आमचं घर जळत आहे. आमच्या घरातील लोक जळत आहे. आम्ही ते उध्वस्त होऊ देणार नाही. लोकांना मान्य असलेला निर्णय आम्ही केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिला निवडणुकीत शिवेसना चौथ्या क्रमांकावर गेली. कोणाला काळजी आहे? चार लोकांच्या कोंडाळ्यामुळे उद्धव ठाकरे हे असे वागतात. शिवसेनेची सत्ता गेली तरी आमच्यासाऱ्यांना व्हॅल्यू नाही. ज्यांची लायकी नाही निवडून यायची ते आमच्यावर बोलतात. आम्ही उद्धव ठाकरे यांची सोडली याचं आम्हालाही दुःख आहे. आम्हाला डुक्कर बोलतात. अशा लोकांसोबत आम्ही कसे राहणार? एका मंत्र्याला भेटायला गेलो तर फोटो काढायची विनंती केली. पण त्या मंत्र्याने फोटोही काढू दिला नाही, अशी आठवण त्यांनी या वेळी सभागृहात सांगितली. तुम्ही गटार आहात, वरळीतून जाऊ देणार नाही, असे म्हणतात. पण त्याची काळजी करू नका. धमक्या आम्हालाही देता येतात, असा थेट इशारा गुलाबराव यांनी दिला. आम्ही 20 आमदार उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो होतो. ज्यांना जायचे त्यांना जाऊ दे, असे तेव्हा ते म्हणाले होते. ही नाराजी आजची नाही. आमदाराची नाराजी कोरोना काळापासून होती. कोणा आमदारेचेही फोन उचलले जात नव्हते, असे गुलाबरावांनी सांगितले.

Latest News