शिवसेनेचा व्हिप फेटाळत भाजपच्या व्हिप प्रमाणे भाजप – शिंदे गटाच्या युतीला बहुमत….


बहुमत चाचणीनंतर अधिकृतरीत्या भाजप आणि शिंदे गट सत्तेत आला. शिवसेनेच्या 16 आमदारांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रस्तावित आहे. जर हा निकाल ह्या बंडखोर आमदारांविरोधात लागला तर पुन्हा हे नवीन सरकार धोक्यात येऊ शकते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यात पुन्हा मध्यवर्ती निवडणुका लागणार असल्याचे म्हटले आहे. आता हे सर्व भाकीत न्यायालयाच्या निकालानंतर खरे-खोटे ठरेल विधानसभेत बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्ष निवडीचे विशेष अधिवेशन सुरु आहे. यात भाजप आणि शिंदे गट 164 मतांनी विजयी झाला आहे. शिंदे गटाच्या 39 बंडखोर आमदारांनी शिवसेनेचा व्हिप फेटाळत भाजपच्या व्हिप प्रमाणे भाजप – शिंदे गटाच्या युतीला मत दिले. त्यामुळे भाजप – शिंदे गटाच्या युतीला बहुमत मिळालेकाल (03 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत देखील भाजप आणि शिंदे गटाला आजच्या एवढीच 164 मते मिळाली. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आणि 107 मते पडून राजन साळवी यांचा पराभव झाला.आजच्या विश्वासदर्शक आणि बहुमत चाचणी प्रस्तावात महाविकास आघाडी सरकारला 99 मते मिळाली. तर 3 आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली. शिंदे सरकारने बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.