कनेडियन फिल्ममेकर लीना मणिमेकलाईच्या ‘काली’ सिनेमाच्या पोस्टरवरुन वाद…


‘काली’ सिनेमाच्या पोस्टरचं समर्थन केलं होतं. भारतीय वंशाची कनेडियन फिल्ममेकर लीना मणिमेकलाईच्या ‘काली’ सिनेमाच्या पोस्टरवरुन मोठा वाद ओढवला आहे. पोस्टरवर ‘काली’ च्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीच्या हातात सिगारेट दाखवली आहे,आणि चक्क ती धुम्रपानही करताना दाखवली गेलीय. तसंच तिच्या हातात LGBTQ चा झेंडा देखील आहे.काली या लीना मणीमेकलाई यांच्या डॉक्युमेंट्री चित्रपटाच्या पोस्टर आणि काही दृश्यांवरुन आता कॅनडासह भारतात वाद पेटला आहे. भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या अटकेची मागणी होते आहे. लीना यांनी सोशल मिडीयावर नुकत्याच काली या त्यांच्या डॉक्युमेंट्री चित्रपटाचं पोस्टर टाकलं आहे. त्यानंतर हा वाद सुरु झालाअयोध्येतील एका साधूंनी याप्रकरणी आता लीना मणीमेकलाई यांना धमकी दिली आहे. अयोध्येतील हनुमान गढी मंदिरातील महंत राजू दास यांनी लीना मणीमेकलाई यांचे शीर धडापासून वेगळे करण्याची त्यांनी धमकी दिली आहे. जेव्हा नुपूर शर्माने योग्य गोष्ट सांगितली तेव्हा जरभर आग लागली, भारताल आग पेटली. तुम्हाला सनातन धर्माचा अपमान करायचा आहे का? तुम्हाला तुमचे शीर तुमच्या शरीरापासून वेगळं करायचं आहे का? असे प्रश्न दास यांनी विचारले. महंत राजू दास यांनी या चित्रपटाच्या पोस्टरचा निषेध करत लीना मणीमेकलाई या सनातम हिंदु धर्माचा अपमान करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्रालयाला केली. या चित्रपटात कालीमाता या हिंदु देवतेच्या अवतारात (पोशाख) एक अभिनेत्री सिगारेट ओढताना दिसते आहे. तसेच तिच्या एका हातात समलैंगिकांचा (LBGTQ) ध्वज देखील दिसत आहे.दरम्यान, लीना मनीमेकलाई यांच्या मते सदर चित्रपट हा ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा फेस्टीवल, आगा खान संग्रहालय, टोरंटो साठीचा एक भाग असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी अशा प्रकारची माहिती देणारी पोस्ट 2 जुलै रोजी ट्विटरवर टाकली होती.