गद्दार हे गद्दार असतात – आदित्य ठाकरे

गद्दार हे गद्दार असतात पण ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे दारं उघडे आहेत असं वक्तव्य शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेना भवनात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी बंड केलेल्या आमदारांवर जोरदार टीका केली.ज्या आमदारांना परत शिवसेनेत यायचं आहे त्यांच्यासाठी सेनेचे दारं उघडे आहेत, गद्दार हे गद्दार असतात असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी येत्या शनिवारी पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे गटाकडे महसूल तर भाजपकडे अर्थ आणि गृहमंत्रिपद जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयाचा पदाभार स्विकारला आहे
.दरम्यान शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत पण शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे असंही ते म्हणाले
.शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसलाय. सेनेचे ५५ पैकी ४० आमदार शिंदे गटात गेले आहेत. तर अजूनही काही आमदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची मागणी केली आहे
. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी काल आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्याने सेनेला मोठा धक्का बसला आहे.एकएक करून सगळेच शिवसेना सोडताना पाहायला मिळत आहेत. याची खबरदारी घेत शिवसेनेने राज्यसभेतील आपला प्रतोद बदलला असून खासदार भावना गवळी यांची उचलबांगडी केली आहे. त्या