कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास (ATS) द्यावा…

गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूरात 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या झाडल्या होत्या. 20 फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. सकाळी बाहेर फिरायला गेले असता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेला आता सात वर्षे पूर्ण झाली असून आद्यापही याबाबतचा तपास लागलेला नाही. रेवती ढेरे आणि न्यायमूर्ती व्हीजी बिष्ट यांच्या पीठापुढे हा अर्ज करण्यात आला आहे. नरेंद्र दाभोलकर, एम.एम.कलबुर्गी, गौरी लंकेश आणि पानसरे यांच्या हत्येमागे मोठा कट असल्याने याचा तपास योग्यप्रकारे होणे गरजेचे असल्याचे पानसरेंच्या वकिलांनी अर्जात म्हटले आहे
.दरम्यान, दाभोलकर प्रकरणाचा तपास सुरू असल्याने दुसऱ्या तपास यंत्रणेकडे देणे अशक्य आहे. मात्र, पानसरेंच्या हत्येचा तपास एटीएसकडे (ATS) देणे शक्य असल्याचे विनंती अर्जात पानसरेंच्या वकिलांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांनी बदलीसाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे. यावर न्यायालयाने 4 आठवड्यात नव्या तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले असून आता तपासणी करत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करता येईल