मुंबई चे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या निवासस्थानांवर सीबीआय चे छापे


मुंबई -ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, राज्याचे माजी पोलिस महासंचालक आणि नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या संजय पांडे यांच्या निवासस्थानांवर सीबीआयने छापेमारी केली आहे. संजय पांडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
.सीबीआयनं संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगडमधल्या घरी छापेमारी केली. मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे. एनएसई घोटाळ्यातील आरोपी चित्रा रामकृष्णन यांनी संजय पांडे यांना एनएसईशी संबंधित लोकांचे फोन रेकॉर्ड करण्यात सांगितलं असा आरोप होतोय.फोन टॅपिंगवरून राज्यात आरोप प्रत्यारोपांची फैरी झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली
समितीने अहवाल सादर केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तो स्वीकारून फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. शुक्ला यांनी पुण्यातील कार्यकाळात पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचं अहवालात म्हटलं आहे. आता याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे