जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे निधणा मुळे उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर…


नवी दिल्ली :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंजो अबे यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत श्रद्धांजली वाहिली. तसेच उद्या ९ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. याद्वारे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्याप्रती आपण मनापासून आदरभाव व्यक्त करत आहोत, असंही PM मोदींनी म्हटलं आहे.जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर एका भाषणादरम्यान पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरानं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, या घटनेत गंभीर जखमी झाल्यानं अबे यांची प्रकृती चिंताजनक होती. पण काही तासांनंतर त्यांचं निधन झालंया संशयिताने भाषणादरम्यान मागच्या बाजूने गोळी झाडल्याचं सांगण्यात येत आहे. या संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची बंदूकही जप्त कऱण्यात आली आहे. हा हल्लेखोर ४० वर्षांचा आहे. शिंजो अबे यांचे भारताशी घनिष्ट संबंध आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात चारवेळा भारताला भेट दिली आहे. शिंजो अबे ६७ वर्षांचे असून आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची जपानमध्ये एका सार्वजिनक सभेदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यामुळं जगभरात खळबळ उडाली आहे. अबे हे भारताचे शुभचिंतक आणि मित्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळंच अबे यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भारतात उद्या, ९ जुलै रोजी एक दिवशीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.