उद्या सुनावणी, आमचा न्यायालय आणि न्यायदेवतेवर संपूर्ण विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपुर-ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली दौरा केला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांच्याशीही दीर्घ चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे उद्याच्या सुनावणीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना कोणतीही काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.पंढरपुरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्या होणाऱ्या सुनावणीबाबत भाष्य केले आहे. याच मेळाव्यात बोलताना शिवसेनेच्या याचिकांवरही शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले की, न्यायालयात रोज एक याचिका दाखल केल्या जात आहेत. सकाळी साडेनऊलाही करतात आणि रात्रीही याचिका दाखल करतात. त्याला आता न्यायालयच वैतागले आहे. ‘हे रोजचं काय चाललंय,’ अशी विचारणा न्यायालयाकडून होत आहे. पण आमचा न्यायालय आणि न्यायदेवतेवर संपूर्ण विश्वास आहे. कारण, आम्ही बेकायदेशीर काम काहीही केलेले नाही.पंढरपूर आपण बेकायदेशीर काहीही केलेले नाही. या राज्यात कायदा, घटना, नियम आहेत. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येत नाही. आम्हीही गेलेलो नाही. जे गेलेत, त्यांना न्यायव्यवस्थेकडून निर्णय मिळेल. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे काळजी करू नका, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात उद्या (ता. ११ जुलै) होणाऱ्या सुनावणीबाबत कार्यकर्त्यांना निश्चिंत राहण्याचा सल्ला दिला. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि तब्बल ३७ पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड केले. त्यानंतर शिवसेना नेतृत्वाकडून विधानसभेतील गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केली होती. तसेच, एकनाथ शिंदे आणि १७ आमदारांवर पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने अपात्रतेची कारवाई करावी, यासाठी शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्या याचिकेवर उद्या (ता. ११ जुलै) सुनावणी होणार आहे, त्याअनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केले