बंडखोर आमदारांमध्ये हिम्मत असेल राजीनामा देऊन विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी-आदित्य ठाकरे

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

राज्यातून विविध जिल्ह्यांमधून पक्ष संघटनेतील अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत. यातील अनेक जण एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांच्या गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या एकूण १८ पैकी १२ ते १४ खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदारांची अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचा खुलासा केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये हिम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान शिवसेनेचे माजी मंत्री आणि युवासेनेचे अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.सत्तांतर झाल्यानंतर राज्यभरातील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा सुरू केली आहे. या अंतर्गत त्यांनी मुंबईतील शाखा-शाखांमध्ये भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आमदार आदित्य ठाकरे पक्ष सोडून गेलेल्या आमदारांबाबत बोलताना म्हणाले, ‘‘

लोकांमधून निवडून आलेल्या या आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. यांच्यामध्ये खरीच हिम्मत असेल तर त्यांनी शिवसेनेच्यावतीने निवडून आलेल्या आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा लोकांसमोर जाऊन निवडून येऊन दाखवावे. लोक जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेलखासदार संपर्कात असल्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी इन्कार केला असला तरी अनेक खासदार शिंदे यांच्या सोबत जाण्याच्या तयारीत आहेत. खासदार सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे यांच्यासह अन्य काही खासदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठींबा देण्यात यावा, अशी भूमिका मांडली आहे.

Latest News