महापालिका रुग्णाालयात राज्य शासनाच्या दर आकारणीस कॉंग्रेसचा विरोध आकारणी ,अन्यथा आंदोलनाचा कॉंग्रेसचा इशारा

महापालिका रुग्णाालयात राज्य शासनाच्या दर आकारणीस कॉंग्रेसचा विरोध पालिका रुग्णालयातील राज्य शासनाचे दर आकारणी धोरण रद्द करा,अन्यथा आंदोलनाचा कॉंग्रेसचा इशारा

पिंपरी,ता.९ः चिंचवड महापालिकेची रुग्णालये (८) व दवाखान्यात (२९)आतापर्यंत अत्यल्प दरात औषधोपचार मिळत होते. काही घटकांना,तर ते मोफतच होते. मात्र,आता तेथील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराकरीता शासन दराप्रमाणे आकारणी करण्याचे पिंपरी पालिकेने ठरवले आहे.

त्यामुळे त्यासाठी आतापेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने कॉंग्रेसने या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. ते रद्द केले नाही,तर जनआंदोलन उभारु,असा इशारा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला आहे.डॉ.कदम यांनी पालिका आय़ुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना पत्र देऊन हा इशारा दिला आहे. कारण त्यांनीच या धोरणाला नुकतीच मंजुरी दिली आहे

. तसेच त्याची आठवड्याभरात अंमलबजावणीही होणार आहे.या नव्या धोरणानुसार पालिका रुग्णालयातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराकरीता आतापेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार असल्याचेपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी आज सांगितले. दरम्यान, या धोरण मंजुरीबाबत कळताच डॉ. कदम यांनी लगेच आयुक्तांना निवेदन दिले

.त्यात त्यांनी पालिकेची ८ रुग्णालये व २९ दवाखान्यात राबविण्यात येणाऱ्या या नव्या धोरणास विरोध केला आहे. तसेच ते रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारले जाईल,असा इशारा दिला आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या कररुपी पैशातून ही आरोग्य सेवा उभी राहिली असून त्यात राज्य सरकारचा कसलाही सहभाग नाही. त्यामुळे तेथे सरकारच्या धोरणानुसार शुल्क आकारणीस विरोध असल्याचे कदम यांनी सांगितले.———

Latest News