PCMC: झाडाची कक्तल फॉर्मायका कंपनीला 45 लाख रुपयांच्या दंडाची नोटीस…

पिंपरी : प्रतिनिधी( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ).

पिंपरी झाड सोडा, त्याची फांदीही विनापरवाना छाटता येत नाही. तरीही उद्योगनगरीतील आकुर्डीतील फॉर्मायका कंपनीने आपल्या आवारातील एक नाही, तर तब्बल ९० झाडे बेकायेदशीरपणे कापलीच नाही, तर ती जेसीबीने मुळासकट गेल्या आठवड्यात उखडूनच टाकली. त्याबाबत अपना वतन संघटनेने तक्रार करताच कंपनीला ४५ लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. तसेच या कंपनीविरुद्ध गुन्हाही दाखल करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत -शेकडो झाडे तोडली असल्याचा संशय याबाबत पालिका आणि पोलिस आयुक्तांकडे तक्रार केलेल्या अपना वतनचे कार्याध्यक्ष हमीद शेख यांनी यासंदर्भात सांगितले.

पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाने आज केली. या तक्रारीत सागवान, लिंब, बाभूळ, वड, पिंपळ अशा विविध प्रजातीच्या काही शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच पालिकेच्या काही अधिकाऱ्यांचे हातही या अवैध वृक्षतोडीत ओले केल्याचा दावा करण्यात आला होता

. या अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ती झालेली नाही. तसेच ती होण्याचीही शक्यता दिसत नाही. उद्यान विभागातील अधिकारी सुपारी घेऊन झाडांची कत्तल करीत आहेत, असे अपना वतनचे संस्थापक अध्यक्ष सिद्दीक शेख यांचे म्हणणे आहे

. ही झाडे तोडल्यानंतर त्याचा पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. झाडे मूळासकट उखडलेली जागा जेसीबीनेच उकरून तिचे सपाटीकरण नंतर करण्यात आले होते. तीस-चाळीस कामगारांनी तोडलेली झाडे दहा-बारा ट्रकमधून नेली. या वाहनांवर पिंपरी-चिंचवड महापालिका असे लिहिले होते, असा आरोप सिद्दीक शेख यांनी केला आहे

. दरम्यान, फॉर्मायका कंपनीला एक झाडामागे पन्नास हजार अशारितीने ९० झाडांची विनापरवाना कत्तल केल्याबद्दल ४५ लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली असल्याचे पिंपरी पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी आज ‘सरकारनामा’ला सांगितले. या कंपनीचा खुलासा समाधानकारक वाटला नाही, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला जाईल, असे ते म्हणाले.

Latest News