माहिती अधिकार कार्यकर्ता हरीश कानसकर विरोधात 12 गुन्हे दाखल…

पुणे प्रतिनिधी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मंचर (ता. आंबेगाव) येथे सुरु असलेले दोन्ही परमीट रूम, बिअर शॉपी हॉटेल बेकायदेशीर आहेत. हॉटेल सुरु ठेवायचे असेल तर माझ्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. हायकोर्टाला जामीन करण्यासाठी मी ५० लाख रुपये घालवले आहेत. ते वसूल कसे होणार, असे सांगून पाच लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा तथा कथित माहिती अधिकार कार्यकर्ता हरीश महादू कानसकर (रा. रांजणी ता. आंबेगाव) याच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १३) रात्री दाखल झाला आहे.

कानसकरला सोमवार (ता. १८) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश घोडेगाव न्यायालयाने दिला आहे.
हॉटेलचे मालक मंगेश मधुकर काळे ( वय ४१ रा. चांडोली बुद्रुक ता. आंबेगाव) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भालेकर, सोमनाथ वाफगावकर या प्रकरणाचा तपास करत आहेत

कानसकरच्या विरोधात आत्तापर्यंत मंचर पोलिस ठाण्यात आठ खंडणी, धमकी, अवैध दारू विक्री असे एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत.काळे यांनी यापूर्वी कानसकरच्या विरोधात तक्रार दिली होती

. कानसकर जामिनावर सुटून आला. दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून वारंवार मंचर येथील दोन्ही हॉटेल, परमीट रूम व बिअरबारच्या विरोधात जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क कार्यालयाकडे तक्रारी अर्ज करण्याची तसेच सुप्रिम कोर्टापर्यंत जाण्याची धमकी देत होता. तक्रार न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत होता.

Latest News