15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शासकीय सुट्टी रद्द, योगी सरकारचा निर्णय…


देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त केंद्र सरकारकडून देशभरात मागील वर्षभरापासून विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यंदाचा आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी अनेक राज्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी 15 ऑगस्ट देशातील सर्व शासकीय, खासगी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असते. बाजारपेठा, उद्योगही बंद असतात. पण यावर्षीचा स्वातंत्र्य दिन त्याला अपवाद ठरणार आहे
. उत्तर प्रदेश सरकारने यावर्षी स्वातंत्र्य दिनादिवशी असलेली सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Independence Day 2022 News)उत्तर प्रदेश सरकारकडून यावर्षी त्यासाठी मोठा निर्णय गेतला आहे. यावर्षी 15 ऑगस्ट रोजी राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, सरकार कार्यालये, खासगी कार्यालये, बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार नाहीत
. या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागतही केलं आहे. तर काही जणांकडून टीकाही होत आहे.उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी पर्व असल्याने हा स्वातंत्र्य दिन विशेष आहे. यावेळी 11 ते 11 ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्य सप्ताहाअंतर्गत प्रत्येक घरावर, आस्थापनांवर तिरंगा फडकवायचा आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या पध्दतीने या सप्ताहात सहभाग घ्यायला हवा भविष्यात असा योग 25 वर्षानंतरच येणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजीचा उत्साह संपूर्ण जगाने पाहायला हवा, असंही मिश्र यांनी स्पष्ट केलं..