१६ जुलै रोजी ‘ पंचतत्व ‘ नृत्य बॅले — ‘भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा


१६ जुलै रोजी ‘ पंचतत्व ‘ नृत्य बॅले ——————————– ‘भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमपुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ पंचतत्त्व ‘ या नृत्य बॅले कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नृत्यनिलय अकादमी प्रस्तुत हा बॅले सौ.स्वरूपा उटगी यांच्या शिष्या सादर करणार आहेत. हा कार्यक्रम शनीवार, १६ जुलै रोजी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे
.त्यात सौ.प्राची नारगोळकर,सौ.स्वानंदी शुक्ल,सौ.अनुज करमरकर,सौ.सृष्टी जोशी,सौ.अनुश्री गोडबोले सहभागी होणार आहेत.स्नेहल झंवर,हीर देढिया,सायंती शारंगपाणी,कोहशिन रैना,गायत्री बारटक्के साथसंगत करणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १३० वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.