शहरांची नावे बदलून जर देशाचा विकास होणार असेल तर देशातील मुस्लीम शहरांची नावे बदला : अबू आझमी

abu-azmi

नवी दिल्ली : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव. धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असून, हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. या नामांतराच्या वादात आता समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी उडी घेत नवीन मागणी केली आहे शहरांची नावे बदलून जर देशाचा विकास होणार असेल तर देशातील सर्व मुस्लीम शहरांची नावे बदण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, शहरांची नावं बदलणं म्हणजे केवळ ढोंगीपणा असल्याची टीका देखील आ. अबू आझमी यांनी केली आहे.

देशात खूप मोकळी जमीन अस्तित्वात असून, त्याठिकाणी नवीन शहरांची निर्मीती करून सरकारने त्यांना हवी तशी नावं द्यावी .ठाकरे सरकारने अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांची नावं बदलण्यात आली होती. त्यावर आज शिंदे सरकारने शिक्कामोर्तब केले

. यावेळी त्यांनी नामांतराच्या मुद्यावरून मविआघा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहेशहरांची नावं बदल्याने जर देशाचा विकास होणार असेल, लोकांना नोकरी मिळणार असेल, भूक मिटणार असेल, महागाई कमी होणार असेल, तर देशातील सर्व मुस्लीम शहरांची नावे बदला अशी मागणी त्यांनी केली आहे.

Latest News