देशात लोकशाहीला सर्वाधिक धोका – शिवसेना प्रवक्ते संजय राऊत

मुबंई | ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )–
लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल तर या देशात लोकशाहीला सर्वाधिक धोका आहे. हे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलं आहे. लोकांचे प्रतिनिधी जे जनतेचे परखड भाषेत प्रश्न मांडतात. त्यांची मुस्कटदाबी करत असाल तर या देशात लोकशाही आहे का? असा प्रश्न आम्हाला त पडलाच आहे पण जगाला देखील पडला आहे, अशी प्रतिक्रिया खा. संजय. राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली
लोकसभा सचिवालयाकडून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काही शब्दांंना निर्बंध घातले आहेत.आता संसदेत भाषण करताना काही शब्द वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. हे शब्द वापरल्यास तुम्हाला संसदेतून निलंबित केलं जाऊ शकतं. यासंबधी अनेक नेत्यांनी विरोधही केला होता. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंबधी माध्यमांशी संवाद साधलाअशा प्रकारचे निर्णय घेऊन लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.
लोकशाहीचे पंख आणि पाय छाटण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये ते जर यशस्वी झाले तर आणखी मोठे निर्णय(decision) घेतले जाऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं आहें .